चीनमधील मुस्लिमांवर आणखी निर्बंध-हलाल उत्पादनांवर बंदी 

संग्रहित छायाचित्र
बीजिंग (चीन): चीनमधील अल्पसंख्य मुस्लिमांवरील निर्बंध अधिकाधिक वाढत आहेत. एका नवीन निर्बंधानुसार उईगर मुस्लिमबहुल प्रांत शिनजियांगमध्ये हलालच्या विरोधात मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. हलाल पद्धतीमुळे विशिष्ट समुदायात धार्मिक कट्टरता वाढत असल्यामुळे हलाल उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. समाजात वैचारिक प्रतिबद्धता मजबूत करण्यासाठी काम करावे असे आदेश शिनजियांगची राजधानी उरुमाकी येथे सत्ताधारी पक्षाने आपल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मिळालेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये सध्या 1 कोटी 20 लाख मुस्लिम राहतात. इस्लामच्या मान्यतेनुसार मुस्लिमांमध्ये मांसाहारासाठी हलाल पद्धत वापरली जाते. गेल्या काही काळात हलाल पद्धतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. आणि यामुळे कट्टरतावादाला उत्तेजन मिळत असल्याने हलाल प्रक्रिया आणि हलाल उत्पादने यांच्यावर कडक बंदी लादण्यात आली आहे. मुस्लिमांचे विचारपरिवर्तन करून त्यांना देशभक्त बनवण्यासाठी चीनमध्ये सक्तीचे शैक्षणिक कॅंप आयोजित केले जातात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)