#फोटो : जगातील सर्वाधिक लांबीच्या पुलाचे लोकापर्ण 

चीनच्या सी ब्रिज पुलाचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. समुद्रावर उभारण्यात आलेला हा पूल जगातील सर्वाधिक लांबीचा आहे. २० अब्ज डॉलर (दीड लाख कोटी रुपये) खर्चून उभारण्यात आलेला हा पूल ५५ किलोमीटर लांबीचा आहे. हा पूल हॉंगकाँगसह मकाऊ आणि जुहाई शहराला जोडणार आहे. या पुलाला बनवण्यासाठी तब्बल ६ वर्षांपर्यंत योजना आखण्यात आली आणि जवळपास ८ वर्ष या पुलाला बनविण्यासाठी लागले आहेत. या पूलासाठी ६५२ मीटर क्षेत्रफळाचा कृत्रिम बेटही समुद्रात बनविण्यात आले होते.  यामुळे हाँगकाँग ते जुहाई दरम्यानचा प्रवास अवघ्या ३० मिनिटांवर येणार आहे. याआधी या प्रवासासाठी ३ तास लागत होते.  या पुलामुळे व्यापार वाढणार असून याचा फायदा चीनच्या अर्थव्यवस्थेला होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)