वॉशिंग्टन (अमेरिका) -चीनबरोबर ” ट्रेड वॉर’ छेडणाऱ्या अमेरिकेची वक्रदृष्टी आता भारताकडे वळण्याची लक्षणे आहेत. भारताची अनेक उत्पादने अमेरिकेत कोणत्याही कराविना निर्यात होत असतात. आता अमेरिकेने अशा शुल्कमुक्त भारतीय उत्पादनांची समीक्षा करून शुल्कमुक्त ठेवण्यास त्यातील किती उत्पादने पात्र आहेत, याची समीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. एका करलाभ योजने अंतर्गत भारताला ही सवलत देण्यात आलेली आहे. रसायन आणि इंजिनीयरिंग सामग्रीसह सुमारे 3500 भारतीय उत्पादने अमेरिकेत विनाशुल्क निर्यात केली जातात. 1976 सालापासून भारताला ही सवलत मिळत आहे
अमेरिकेच्या नवीन समीक्षेचा या 3500 भारतीय उत्पादनांच्या निर्यातीवर परिणाम होणार आहे. अशीच सवलत इंडोनेशिया आणि कजाख्जस्तानलाही देण्यात येते. या तिन्ही देशांच्या उत्पादनांच्या नि:शुल्क आयातीबाबत ट्रम्प प्रशासन समीक्षा करत असल्याची घोषणा अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी कार्यालयाने शुक्रवारी केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा