चीनने ३० दिवसात तब्बल 35 वेळा भारतीय हद्दीत प्रवेश केला

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून चीनकडून वारंवार घुसखोरी केली जात आहे. गेल्या महिन्याभरात चिनी सैन्याने तब्बल 35 वेळा भारतीय हद्दीत प्रवेश केला आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) या घुसखोरीला तीव्र विरोध केल्यामुळे चिनी सैन्याला माघार घ्यावी लागली. एका बाजूला पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू असताना दुसऱ्या बाजूला चीनने घुसखोरी सुरू केल्याने भारताची डोकेदुखी वाढली आहे.

एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, एप्रिल महिन्यात चिनी सैन्यानं लडाखच्या उत्तर भागात सकाळी 7 वाजता घुसखोरी केली. चिनी सैनिक त्यांच्या वाहनातून जवळपास 14 किलोमीटर आत घुसले होते. त्यानंतर त्यांना इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी रोखले. याशिवाय चिनी सैन्याने लडाखच्या ट्रिग हाईट भागातदेखील अनेकदा घुसखोरी केली आहे. 18 मार्च, 21 मार्च, 24 मार्च आणि 30 मार्चला चिनी सैन्य भारतीय हद्दीत 8 किलोमीटरपर्यंत आले होते.

-Ads-

आयटीबीपीच्या अहवालानुसार, लडाखच्या ट्रॅक जंक्शन येथे सकाळी साडे आठ वाजता चिनी हेलिकॉप्टरने घुसखोरी केली. चिनी हेलिकॉप्टर जवळपास 18 किलोमीटर भारतीय हद्दीत आले होते. याचाही आयटीबीपीने विरोध केला. याबद्दलचा अहवाल आयटीबीपीकडून गृह मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. चिनी सैन्याने 29 आणि 30 मार्चला अरुणाचल प्रदेशातील असफिला भागात 4 किलोमीटरपर्यंत घुसखोरी केल्याची माहिती या अहवालात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)