चीनने सैनिकांची क्षमता वाढविण्यासाठी लष्करी प्रशिक्षण कालावधी वाढवला

बीजिंग (चीन) – चीनने लष्करात नवीन भरती होणाऱ्या सैनिकांच्या प्रशिक्षण कालावधीत वाढ केली आहे. सैनिकांची युद्धक्षमता वाढवण्यासाठी असे करण्यात आलेले आहे. आपले लष्कर अधिक युद्धसज्ज करण्यासाठी चीनने सैनिकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिन्यांवरून वाढवून सहा महिने केला आहे.

चीनच्या सरकारी माध्यमांनी ही माहिती प्रसिद्ध केली आहे. नवीन सैनिकांच्या विविध कंपन्या स्थापन करण्यापूर्वी पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देणार आहे. 20 लाख सैनिक असणारे पीएलए हे जगातील सगळ्यांत मोठे लष्कर आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)