चीनने बांधला सोलर हायवे 

बिजिंग – चीनने सोलर हायवेची उभारणी केली असून हा हायवे जगातील पहिला सोलर हायवे ठरला आहे. एक किलोमीटर लांबीचा हा हायवे असून याद्वारे विद्युतनिर्मिती करता येणार आहे. तसेच भविष्यात इलेक्‍ट्रिक वाहनांना चार्ज करण्याचे कामदेखील हा हायवे करणार असल्याचे म्हंटले जात आहे. चीनमधील जिनान प्रांतामध्ये हा हायवे बांधण्यात आला आहे.
चीनमध्ये बांधण्यात आलेला हा सोलर हायवे तीन मजली आहे.

यामध्ये कॉंक्रीट, सिलिकॉन पॅनल्स आणि इन्सुलेशनचे लेअर्स आहेत. या हायवेच्या माध्यमातून एका वर्षात 10 मिलियन म्हणजे 1 कोटी किलोवॅट वीजनिर्मित केली जाऊ शकते. तसेच याद्वारे हिवाळ्यात जमलेला बर्फ वितळवण्याचे कामही होऊ शकते. एक किलोमीटरच्या या सोलर हायवेने 63,200 स्क्वेअर फूट परिसर व्यापला आहे. सामान्य हायवेच्या तुलनेत हा सोलार हायवे दहा पट अधिक भार झेलू शकतो. दरम्यान, सोलर हायवे प्रकल्पावर फ्रान्स, हॉलंड सारखे देशही काम करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)