चीनने बनवला महाबॉम्ब

बिजींग: अमेरिकेने बनवलेल्या महाशक्तीशाली बॉंम्बला प्रत्युत्तर म्हणून चीनने तशाच प्रकारच महाबॉम्ब बनवला असल्याचे वृत्त आहे. चीनच्या नोरिंको संरक्षण उत्पादन कंपनीने हा बॉम्ब बनवला असून त्यांनी तो प्रथमच लोकांच्या प्रदर्शनासाठी खुला केला आहे. चीनने त्याला मदर ऑफ ऑल बॉंम्ब असे संबोधले आहे. त्याची क्षमता अतितीव्र आहे. अणुबॉम्बच्या शक्ती इतकीच जवळपास त्याची क्षमता आहे. सदर कंपनीने त्याची चाचणीही घेतली असून त्या चाचणीचा व्हिडीओ त्यांनी खुला केला आहे. डिसेंबर महिन्याच्या अखेरीला त्यांनी ही चाचणी घेतली असल्याचे एका चीनी वृत्तपत्रांत म्हटले आहे.

अमेरिकेने जो महाबॉंम्ब बनवला आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनने हा बॉम्ब बनवला असल्याचे सांगण्यात येत आहे. अमेरिकेच्या महाबॉंम्बचे नाव जीबीयु – 43/ बी असे आहे. त्याचा वापर अमेरिकेने अफगाणिस्तानात केला होता. तथापी चीनने बनवलेल्या या बॉम्बचे वजन आणि आकार अमेरिकेने बनवलेल्या बॉम्ब पेक्षा लहान असला तरी त्याची मारक क्षमता त्यांच्या बॉम्ब इतकीच आहे असे त्यांचे म्हणणे आहे. हा अणु बॉम्ब नाही असेही त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पाच ते सहा मीटर लांबीच्या या बॉम्ब मध्ये अनेक वर्ग मीटर क्षेत्राचे पुर्ण नुकसान करण्याची क्षमता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)