चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारताची नवी रणनीती

नवी दिल्ली – डोकलामसारखा संघर्ष पुन्हा घडू नये यासाठी भारताने अरुणाचल प्रदेशमधील चीनला लागून असणाऱ्या तिबेट भागातील सीमेवर अतिरिक्त सैन्य तुकडया तैनात केल्या आहेत. त्याचप्रमाणे दिबांग, दाऊ-दिलाई आणि लोहित खोऱ्यातील डोंगराळ भागात गस्तही वाढवण्यात आली आहे.

तिबेटला लागून असणाऱ्या सीमेवर रणनितीक दृष्टया महत्वाच्या भागातील चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आपली टेहळणी क्षमता अधिक मजबूत करत आहे तसेच नियमित आढावा घेण्यासाठी हेलिकॉप्टर्सची सुद्धा व्यवस्था करण्यात येईल असे लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले. दिबांग, दाऊ-दिलाई आणि लोहित खोऱ्यातील चीनच्या वाढत्या आक्रमकतेला रोखण्यासाठी डोंगराळ भागावर आपली पकड आणि वर्चस्व ठेवण्याची भारताची रणनिती आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)