चीनच्या वरीष्ठ नेत्यांशी अजित डोवाल यांची चर्चा

बिजींग – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे वरीष्ठ नेते यांग जीची यांच्याशी शांघाय येथे चर्चा केल्याची माहिती भारतीय दूतावासाने दिली आहे. डोकलाम मध्ये दोन्ही देशांमध्ये तणाव उद्‌भवल्यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये झालेली चर्चेची ही दुसरी फेरी आहे. अजित डोवाल आणि यांग जीची यांच्यात झालेल्या चर्चेविषयी भारतीय दुतावासाने त्रोटक पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यात या दोन प्रतिनिधींमध्ये शांघाय मध्ये चर्चा झाली एवढेच म्हटले आहे अन्य तपशील भारतीय दूतावासाने दिलेला नाही.

यांग हे भारत-चीन सीमा प्रश्‍नावर चीनच्यावतीने बाजू मांडण्याचे काम करीत होते. ते चीनच्या विदेश व्यवहार आयोगाचे संचालक होते पण त्यांची अलिकडेच कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाच्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. शांघाय कोऑपरेशन संघटनेच्या बैठकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जून महिन्यात चीनला जाणार आहेत. त्या पाश्‌र्वभूमीवर या प्रतिनिधींमध्ये झालेल्या चर्चेला महत्व आहे.शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन ही आठ देशांची संघटना असून त्यात भारत हा आठवा सदस्य देश नुकताच बनला आहे. चीन खेरीज कझाकस्तान, किरगीजस्तान, रशिया, उझबेकिस्तान आणि पाकिस्तान हे या संघटनेचे अन्य देश आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)