चीनच्या धमकीमुळे तैवानचे आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन

ताईपे (तैवान)- चीनने दिलेल्या शक्तिप्रयोगच्या धमकीमुऴे तैवानने आंतरराष्ट्रीय समुदायाला मदतीचे आवाहन केले आहे. तैवान शांततेने चीनमध्ये सामील झाला नाही, तर तैवानविरुद्ध शक्तीचा वापर करण्याई धमकी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी दिली आहे. त्यामुळे तैवानमधील लोकशाहीच्या रक्षणासाठी आंतराष्ट्रीय समुदायाने पुढे यावे असे तैवानच्या अध्यक्षा साई इंग-वेंग यांनी म्ह्टले आहे.

तैवान हा चीनसाठी अत्यंत संवेदनशील विषय आहे. तैवान हा चीनचाच भाग आहे. आणि हे सत्य कोणीही डावलू शकत नाही. असे चीनचे म्हणणे आहे. आणि जर शांतिपूर्ण मार्गाने तैवान चीनमधे विलीन झाला नाही, तर चीन त्यासाठी बळाचा वापर करू शकेल असे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी बुधवारी म्हटले होते. त्या पार्श्‍वभूमीवर तैवानच्या अध्यक्षा साई इंग-वेंग यांनी आंतरराष्ट्रीय समुदायास हे आवाहन केले आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)