चीनच्या अध्यक्षांनी दिले लष्कराला युद्धसज्जतेचे आदेश

अमेरिकेशी असलेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर घेतील आक्रमक भूमिका

बिजींग: चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी आपल्या लष्कराला युद्ध सज्ज राहण्याचा आदेश दिला असल्याचे वृत्त आहे. शुक्रवारी अध्यक्षांनी चीनी लष्कराच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यात त्यांनी लष्कराला कोणत्याही प्रसंगाला तोंड देण्यासाठी शक्‍य तितक्‍या लवकर तयार राहण्याची सज्जता ठेवा अशी सुचना केली आहे. चीन आणि अमेरिका यांच्यात सध्या अनेक विषयांवरून वाद सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर अध्यक्ष जिनपिंग यांनी हा आदेश दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अमेरिकेबरोबर चीनचे व्यापार विषयक बाबींपासून तैवान तणावापर्यंत अनेक विषयांवरून सध्या वाद सुरू आहेत. त्यातच दक्षिण चीन सागरी हद्दीतही काही कटकटी नव्याने उद्‌भवल्या आहेत. त्यामुळे चीनपुढे कोणतीही परिस्थिती उद्‌भवू शकते. नव्याने उद्‌भवणाऱ्या गरजेनुसार प्रतिसाद देण्याची सज्जता लष्कराने ठेवली पाहिजे अशी सूचना शी जिनपिंग यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली. चीनचे अध्यक्ष या नात्याने ते चीनी लष्कराचे सर्वोच्च कमांडर आहेत. त्यांनी थेट युद्धालाच तयार राहण्याच्या सुचना देणे काहीसे आश्‍चर्यकारक मानले जात आहे.

त्यांनी या बैठकीत सांगितले की या शतकात यापुर्वी कधीही नव्हती इतकी जागतिक स्थिती झपाट्याने बदलत असून या घडामोडीत चीनला महत्वाची भूमिका बजावावी लागू शकते असे ते म्हणाले. कोणत्याही आणिबाणीच्या प्रंसगाला त्वरीत सामोरे जाण्याची क्षमता लष्कराने तयार ठेवली पाहिजे असे ते म्हणाले.तैवान मध्ये स्वतंत्र होण्याची भाषा सुरू झाली असून हा प्रांत चीनच्यामुख्य भूमीशी संलग्न करून घेण्यासाठी लष्करी अधिकाराचा वापर करण्याचा पर्याय आम्ही राखून ठेवला आहे असेही चीनी अध्यक्षांनी अलिकडेच नमूद केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)