चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पुढील महिन्यात उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार

शांघाय(चीन) – चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग पुढील महिन्यात उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुढील महिन्यात 9 तारखेला उत्तर कोरियाचा 70वा स्थापना दिवस आहे. त्या समारोहासाठी उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी शी जिनपिंग यांना निमंत्रण दिले आहे. सन्‌ 2012 मध्ये सत्तेवर आल्यापासून शी जिनपिंग हे प्रथमच उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते उत्तर कोरियाची राजधानी प्यॉंगयागला जाणार आहेत.

सन 2005 मध्ये चीनचे तत्कलीन्‌ अध्यक्ष हू जिंताओ यांनी प्यॉंगवॉंगचा दौरा केला होता. मात्र्‌ त्याबाबता चीनच्या परराष्टृ मंत्राल्यने आजतागायत कोणतेही निवेदन केलेले नाही. चीन हा उत्तर कोरियाचा अत्यंत जवळचा सहयोगी देश मानला जातो. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र्‌ चाचणीच्या काळात उत्तर कोरियावर अमेरिकन निर्बंध असूनही चीनने उत्तर कोरियाबरोबरचे व्यापारी संबंध चालूच ठेवले होते. उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी तीन वेळा चीनला भेट दिली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)