चीनची दादागिरी-कर्जाचा हप्ता न दिल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा?

बीजिंग: कर्जाचा हप्ता न दिल्याने चीनने एका अफ्रिकन राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कब्जा मिळवला आहे. झांबिया हे आफ्रिकन राष्ट्र चीनच्या कर्जाची परतफेड करू शकत नसल्याने त्याच्या आंतराष्ट्रीय विमानतळावर चीनने कब्जा करण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. चीनने झांबियाला दिलेल्या कर्जाच्या अटींचा नीट अभ्यास न केल्याने झांबियावर ही वेळ आली आहे.

आपल्या विस्तारवादी धोरणाने चीन आशिया खंडातच नाही, तर आफ्रिका खंडातही हातपाय पसरत आहे,. या राष्ट्रांत चीन मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहे. त्यांना कर्ज देत आहे. आणि कर्जाच्या बोझ्याखाली त्यांचावर वर्चस्व गाजवत आहे. आफ्रिकेत चीन एक आधुनिक वसाहत बनवण्याच्या तयारीत आहे. झांबियाच्या राष्ट्रीय प्रसारण कॉर्पोरेशनमध्ये चीनचा सहभाग 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक आहे या वरून त्याची चांगली कल्पना येऊ शकेल.याचाच अर्थ असा, की झांबियात चीनच्या परवानगीशिवाय कोणतीही माहिती प्रसारित होऊ शकत नाही. वेळेत कर्जफेड न केल्यास केनेथ कोंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेण्याचा प्रस्ताव चीनने दिला आहे. चीनचे कर्ज फेडण्याची झांबियाची क्षमता आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)