चीनची दगाबाजी – हिवाळ्यात दक्षिण डोकलामपर्यंत बनवला नवीन मार्ग

नवी दिल्ली – चीनने दक्षिण डोकलामपर्यंत पोहचण्यासाठी नवीन मार्ग तयार केला आहे. मागील वर्षी डोकलाम मध्ये मार्ग तयार करणाऱ्या चिनी लष्कराला भारतीय जवानांनी रोखले होते. तेव्हा दोन देशांमधील तणाव वाढला होता दोघांचीही लष्करे आमने सामने उभी होती. मात्र नंतर डोकलाम विवाद चर्चेने मिटला.

चीनने डोकलाम विवाद सामोपचाराने मिटला आहे असे मान्य केल्यानंतरही ऐन हिवाळ्यात चीनने दक्षिण डोकलामपर्यंत नवीन मार्ग बनवला आहे. हा मार्ग भारतीय चौक्‍यांपासून 5 किमी अंतरावर आहे. त्यामुळे जवानांना तेथपर्यंत पोहचणे शक्‍य नाही. डोकलाम क्षेत्राबाबत चीन आणि भूतानचा वाद आहे. या मार्गामुळे चिनी सैन्य डोकलामपर्यंत सहजतेने पोहचू शकणार आहे.

डोकलाम क्षेत्रात चीन नवीन चौक्‍या आणि नवीन हेलिपॅड निर्माण करत असल्याचे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी अलीकडेच संसदेत सांगितले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)