चीनचा तिबेटमध्ये लष्करी सराव

बिजींग : चीनच्या लाल सेनेने तिबेटच्या उंचीवरील प्रदेशात व्यापक प्रमाणात लष्करी कवायती केल्या आहेत. डोकलाम संघर्षानंतर प्रथमच तिबेटमध्ये अशा कवायती झाल्या आहेत. तिबेटच्या नग्री भागात हा सराव होत असून त्याकडे भारताचेही लक्ष आहे, असे सांगण्यात आले आहे.

तिबेटच्या हिमालयानजीकच्या भागात चीनी सेनेच्या हालचाली वाढल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत देशाचे संरक्षण करण्याची सैन्याची तयारी तपासण्यासाठी या कवायती होत आहेत, असे सांगण्यात आले आहे. तिबेटमध्ये मानवी वस्तीसाठी प्रतिकूल असणारा मोठा प्रदेश आहे. तेथेच या कवायती होत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या भागातील स्थानिकांचे साहाय्य घेऊन कवायतींची योजना बनवण्यात आली. हा स्थानिक रहिवासी आणि सैन्य यांच्या परस्पर सहकार्याचा उत्तम नमुना म्हणून ओळखला जाईल, अशी प्रतिक्रिया चीनी सेनेच्या प्रवक्त्याने व्यक्त केली. कवायतींचा उद्देश कोणत्याही देशाविरोधात नसून चीनी सेना आणि नागरीक यांच्यातील संबंध दृढ करण्याचा आहे, असा खुलासा प्रवक्त्याने केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)