चीनकडून हायपरसोनिक विमानाची चाचणी

बिजींग – चीनने अतिवेगवान “हायपरसोनिक’ विमानाची यशस्वी चाचणी घेतली आहे. अण्वस्त्रे वाहून घेऊन जाऊ शकणारे हे विमान ध्वनीच्या पाचपट वेगाने जाऊ शकणारे असल्याने सद्यस्थितीतील कोणत्याही क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेतही सुरक्षित राहण्यास सक्षम असेल.

“शिंगकॉंग- 2′ असे नाव असलेले हे विमान “स्टॅरी स्काय- 2′ नावानेही परिचित आहे. शुक्रवारी वायव्य चीनमध्ये याची चाचणी घेण्यात आली, असे शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. रॉकेटच्या सहाय्याने हे विमान प्रथम अवकाशात सोडण्यात आले. नंतर रॉकेटपासून अलग होऊन या विमानाने पर्वतरांगांमध्ये वेगवान घिरट्या घेतल्या आणि सुरक्षितपणे ते जमिनीवर उतरले. आकाशामध्ये 30 किलोमीटर पर्यंतची उंची या विमानाने गाठली होती, असे “चायना ऍकेडमी ऑफ एरोस्पेस एरोडायनामिक्‍स’ने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अतिवेगवान विमानाच्या चाचणीदरम्यान वेगवेगळे निकष पडताळून पाहण्यात आले असून या निकषांवर हे विमान यशस्वी ठरले आहे. विशेषतः क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेला भेदू शकणाऱ्या वेगाचा प्रमुख निकष या विमानाने पार केला असल्याचे निवेदनामध्ये म्हटले आहे. क्रूझ आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांपासून बचाव होण्यासाठीच ही अतिवेगवान विमानाची रचना करण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)