चीनकडून सक्षम नौदलाची उभारणी

अमेरिकन कॉंग्रेस अहवालातील माहिती

वॉशिंग्टन – चीनकडून आधुनिक आणि सक्षम नौदल उभारणी केली जात असल्याची माहिती अमेरिकन कॉंग्रेसच्या एका अहवालात देण्यात आली आहे. संख्यात्मक क्षमतावाढीपेक्षा गुणात्मक आणि दर्जात्तमक वाढीवर चीनच्या नौदलाने भर दिला आहे असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

चीनी जहाजांनी आता आपला वावर वाढवला असून आपल्या सागरी हद्दीपेक्षा ते आता शेजारील देशांच्या सागरी हद्दीत वारंवार येजा करू लागले आहेत. तैवान किंवा अन्य संबंधीत देशांमध्य अमेरिकेचा हस्तक्षेप टाळण्यासाठी चीनकडून सक्षम लष्करी यंत्रणा उभारण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे.

चीनने चालवलेल्या या नौदल आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला अमेरिकेनही तशीच कृती करून प्रत्युत्तर देण्याची गरज या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. चीनचा अन्य देशांमध्ये लष्करी तळ उभारणीचा प्रयत्न असून त्यासाठीही या नौदलाचा वापर करण्याची त्यांची योजना आहे. अशा प्रकारचा पहिला लष्करी तळ त्यांनी दिजीबौती येथे उभारला आहे.

पाकिस्तानच्या ग्वादर बंदरात अधिक लढाऊ जहाजे तैनात करण्याचेही त्यांचे लक्ष्य आहे असेही या अहवालात म्हटले आहे. चीन आपल्या नौदलाची ताकद वाढवत असताना अमेरिकेने मात्र आपल्या लष्करी आकारात आणि अर्थसंकल्पीय तरतूदीत जी कपात केली आहे ती चिंताजनक ठरत आहे असा अभिप्रायही या अहवालात शेवटी व्यक्त करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)