चीनकडून पाकिस्तानला मिसाईल ट्रॅकिंग सिस्टीम

बिजींग – आक्रमण करणाऱ्या क्षेपणास्त्रांना शोधणारी “मिसाईल ट्रॅकिंग सिस्टीम’ चीनकडून पाकिस्तानने खरेदी केली आहे. या सिस्टीममुळे चीनकडून पाकिस्तानला मिळणाऱ्या क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या विकासाला अधिकच वेग मिळणार आहे. “चायनीज ऍकेडमी ऑफ सायन्स’ने ही माहिती दिली आहे.

चीनी बनावटीच्या क्षेपणास्त्र चाचणी आणि विकसित करण्यासाठीची ही प्रणाली नुकतीच पाकिस्तानी लष्कराने तैनात केली आहे, असे हॉंगकॉंगमधील एका वर्तमानपत्राने “सीएएस’च्या हवाल्याने म्हटले आहे. ही प्रणाली पाकिस्तानला निर्यात करणारा चीन हा पहिला देश आहे, असेही “सीएएस’ने म्हटले आहे.

भारताकडून सर्वात आधुनिक अण्वस्त्रसज्ज आंतरखंडीय “अग्नि 5′ या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली गेली असल्याने बीजिंगने पाकिस्तानला ही प्रणाली निर्यात केली असल्याचेही या वृत्तामध्ये नमूद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)