चिमुरडीशी गैरवर्तन करणारा अटकेत

पिंपरी – सोसायटी मधील टॉयलेटमध्ये पाच वर्षाच्या चिमुरडीला बोलावून तिच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच तिच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार देऊ नये, यासाठी कोयत्याचा धाक दाखवून धमकावले. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि. 15) दुपारी अडीचच्या सुमारास औंध येथे घडली.

उमेश उर्फ पप्पू रवींद्र सरकनीया (वय-31, रा. औंध) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित चिमुरडीच्या आईने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी आरोपीने वसाहतीमधील टॉयलेटमध्ये फिर्यादी यांच्या पाच वर्षीय मुलीला बोलावले. तिथे त्याने तिच्यासमोर अश्लील वर्तन केले. याबाबत मुलीने घरी सांगितले. त्यावरून फिर्यादी यांनी त्याला याबाबत विचारणा केली असता त्याने कोयत्याचा धड दाखवून ‘जर तुम्ही पोलिसात गेलात तर तुम्हाला संपवून टाकीन’ अशी धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सांगवी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक खटाळ तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)