चिमुटभर हळद औषधीच! वाचा, कसा कराल वापर…

चार हजार वर्षापूर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहे. यामधील कक्‍रयुमिनसारखे अनेक औषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून आपला बचाव करतात. हळदीला दुस-या औषधी पदार्थामध्ये मिसळून वापरल्यास त्याचे अनेक फायदे होतात.
मजबूत हाडे : 
अर्धा चमचा हळद, अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
मजबूत हिरडया : 
अर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरडयांची मालिश करा.
चमकदार दात : 
अर्धा चमचा हळदीमध्ये अर्धा चमचा खातासोडा मिसळून दात घासल्याने दात चमकतात.
सर्दी-पडसे, ताप : 
एक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा हळद भाजून घ्या. हे मिश्रण मधामध्ये मिसळून खा.
जखम : 
जखमेवर अर्धा चमचा भाजलेली हळद आणि मध लावल्याने हे अँटिबॅक्‍टेरियलचे काम करते. अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चुना एक चमचा मधामध्ये मिसळून लावा. हळदीचे दूध नियमित प्या.
घशात वेदना : 
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर मीठ मिसळून गुळण्या करा. हळदीचे दूध प्या.
त्वचारोग : 
एक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून त्वचारोगावर नियमित लावा. अशा प्रकारे हळद हे एक वनस्पतीजन्य अँटीबायोटीकच असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)