नारायणगाव- नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या अनंतराव इंग्लिश मीडिअम स्कूलमध्ये रोटरी क्‍लब नारायणगाव, आर्किटेक्‍ट सचिन घोडेकर आणि मूर्तिकार धीरज दळवी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीचे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मूर्तीकार धीरज दळवी व आर्किटेक्‍ट सचिन घोडेकर यांनी मूर्ती बनविणे व रंगविण्याबाबत मुलांना मार्गदर्शन केले. तसेच रोटरी क्‍लबचे अध्यक्ष योगेश भिडे यांनी पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे आवाहन मुलांना केले. उत्कृष्ट मूर्ती बनविणाऱ्या मुलांना बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत जय शहा याने प्रथम, आदित्य खांडगे याने द्वितीय व साहिल कुमकर याने तृतीय क्रमांक पटकाविला. मुलींच्या गटात साक्षी औटी प्रथम, श्रावणी बढे द्वितीय व आत्मजा सराईकर तृतीय आली. यावेळी मुख्याध्यापिका अनघा जोशी, रोटरीचे डॉ. प्रशांत काचळे, अरविंद ब्रह्मे, श्रीकांत शेवाळे, व माऊली लोखंडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)