चिमुकल्यानी जपले भावा-बहिणेचे नाते

नारायणगाव – पुणे येथील कृषी महाविद्यालयातील कृषिकन्यांनी येडगाव (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रक्षाबंधनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांना भावा-बहिणींच्या अतूट बंधनाचे महत्त्व घोडे सरांनी सांगितले. नंतर शाळेतील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. यावेळी मुख्याध्यापिका विनिता शिंदे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन कृषिकन्या माया गडदे, जनाबाई लोंढे, स्नेहल भुजंग, प्रतिक्षा पवार, प्रतिभा गटकाळ, कविता चिचोंले यांनी केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)