चिमुकल्याची बहादुरी! अपहरण कर्त्यांच्या हातावर ठेवली तुरी

पुणे – लहान मुलांच्या अपहरणच्या घटना वाढत चालल्या आहेत. एका 13 वर्षांच्या मुलाचे पुण्यात दोन इसमांनी अपहरण केले. फोंडवाडा परिसरात राहणाऱ्या चिमुकल्या बुरहाने बहादुरी दाखवून आपली सुटका करुन घेतली.

सविस्तर वृत्त असे की, बुरहान नुद्दिन आईच्या सांगण्यावरून 16 जुलै रोजी तो भावासोबत घराजवळच काही समान आण्यासाठी गेला होता. इतक्‍यात दोन इसमांनी त्याला रिक्षात घालून पुणे रेल्वे स्थानकात घेऊन आले. मात्र, त्याने अपहरणकर्त्यांची नजर चुकवून पळ काढाला आणि तो थेट पुणे-जोधपूर या ट्रेनमध्ये जाऊन लपून बसला. ट्रेनमधील एका व्यक्‍तीने त्याची विचारपूस केली. बुरहानने त्याच्या मदतीने आपल्या वडिलांना फोन लावला. त्यांनी त्याला वसईला उतरवण्यास सागितले. यानंतर त्यांच्या वसईतील नातेवाईकांनी आणि मित्रांनी त्याला रेल्वे पोलिसांच्या मदतीने सुखरुप ताब्यात घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)