चिमुकल्याचा खून करून आईची आत्महत्या

हडपसरमधील खळबळजनक घटना : सासूरवास होत असल्याचा उल्लेख

पुणे – पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना मगरपट्टा, हडपसर येथे शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकात काम करणारा पोलीस कर्मचारी अमित दत्तात्रय कांबळे यांची पत्नी पूनम उर्फ जान्हवी (वय-22) हिने आपल्या अवघ्या दोन वर्षांच्या कोवळ्या शिवांश या मुलाचा खून करून गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने लिहलेल्या “सुसाईड नोट’मध्ये “अमित (पती) तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, मात्र वेळ देऊ शकत नाही, हे माझे दुर्दैव आहे,’ असे म्हटल्याचे आढळले आहे.

यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “कांबळे हे रात्रपाळी संपवून पहाटे पाचच्या सुमारास घरी गेले. तेव्हा खिडकी उघडी होती व बेडरुमचा लाईटही सुरू होता. यामुळे त्यांनी घरात डोकवून पाहिले असता, त्यांना पूनमने गळफास घेतल्याचे व मुलाचा गळा दाबून खून केल्याचे लक्षात आले. त्यांना तेथे “सुसाईड नोट’ही सापडली.
यासंदर्भात पूनमच्या नातेवाईकांनी सांगितले की, “पूनमचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला होता. तिने अनेकदा फोन करुन सासूरवास होत असल्याची माहिती दिली होती. मात्र, परिस्थिती सुधारेल म्हणून समजूत घातली जात होती.’ याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक लोणारे करत आहेत.

सासू छळ करत असल्याचा उल्लेख
यासंदर्भात माहिती देताना पोलिसांनी सांगितले, “सुसाईड नोटसमध्ये सासू छळ करत असल्याचा उल्लेख आहे. यामुळे फक्त सासू विरोधातच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.’

 
शारीरिक छळाची तक्रार
यासंदर्भात पूनमच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, “लग्नात मानपान केला नाही तसेच सोन्याचे दागिने घातले नाहीत म्हणून पूनमचा छळ केला जात होता. तसेच सतत “तू गरीब घरातून आली आहेस, तुला आम्ही फुकटात आणली आहे,’ असे म्हणत शारीरिक छळ केला जात होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)