चिमुकल्यांच्या नृत्याने जिंकली मने

बोपखेल – चार-पाच वर्षांच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या आकर्षक नृत्याने पालकांसह उपस्थितांची मने जिंकली. बोपखेल येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इंग्रजी विद्यालयात स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा घुगे व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदिनाथ कराड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये शाळेतील ज्युनियर केजी पासून ते ग्रेड एकपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

कार्यक्रमामध्ये शाळा व्यवस्थापन समिती ने वर्षभर केलेल्या कामाची दखल घेण्यात आली. पहिलीच्या मुलांनी बाल कामगार या विषयावर एक छोटेसे नाटक सुद्धा सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील सोशल वर्कर निखिल एकबोटे यांनी केली तर कार्यक्रमाची सांगता शाळेच्या मुख्याध्यापिका हीना नरूला यांच्या मनोगताने झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)