चिमुकल्यांच्या दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले

पवना नगर – शैक्षणिक उपक्रमांतर्गत ब्राम्हणोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या दिंडीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. चिमुकल्यांच्या कौतुकाने दिंडी आनंदात व उत्साहात पार पडली. ग्रामस्थांनी दिंडीचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्‍वर, नामदेव, तुकाराम, मुक्‍ताई यांच्या वेषभूषेत हरिनाम जयघोषात पालखीची मिरवणूक काढली. वृक्ष दिंडी, ग्रंथ दिंडीही सहभागी होती. महिलांनी पालखीला ओवाळून पूजा केली. केंद्र प्रमुख रामराव जगदाळे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील यावेळी उपस्थित होते. तरूणही सहभागी झाले होते. रामराव जगदाळे म्हणाले, सांप्रदायिक क्षेत्रातील संत, वारकरी यांचे विचार विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे, यासाठी शालेय जीवनात अशा दिंडींचे आयोजन गरजेचे आहे.
ग्रामस्थांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. मंदिरात आरती, महाप्रसाद व नंतर समारोप झाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)