चिमुकलीवर बलात्कार करणा-या नराधमास 14 वर्षांचा कारावास

धुळे – चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार करणाऱ्या नराधमास 14 वर्षांची शिक्षा आणि 40 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दंड न भरल्यास सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल, असा निर्णय धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दिला आहे.

धुळे येथील जिल्हा आणि सत्र न्यायाधीश डॉ. सृष्टी नीलकंठ यांनी 2013 सालच्या या प्रकरणावर हा आदेश दिला आहे. ही घटना धुळे शहरातील मोहाडी परिसरात 1 मार्च 2013 रोजी घडली होती. चार वर्षीय चिमुकलीच्या परिवाराशी परिचित गावातील गोविंद नारायण घुले या नराधमाने वडिलांकडे घेऊन जातो अशी बतावणी केली. त्यानंतर मोहाडी गावापासून काही अंतरावर असलेल्या एका निर्जनस्थळी नेत त्या ठिकाणी या चार वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केला.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध बलात्कार, तसेच लहान मुलांचे लैंगिक प्रतिबंधक अत्याचार अधिनियम कलम 3, 4, 6 अन्वये मोहाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. न्यायालयात साक्षीदार, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, तपास अधिकारी यांनी दिलेल्या साक्षी आरोपीला कठोर शिक्षा सुनावण्यासाठी निर्णायक ठरल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)