चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला 12 वर्षांची सक्तमजुरी

पुणे – अपहरण करून 9 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला 12 वर्षे सक्तमजुरी आणि 21 हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश आर. व्ही. अदोने यांनी सुनावली. दंडाच्या रकमेतून पीडित मुलीला 10 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्यात यावेत आणि दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 6 महिने कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

नितीन मारुती ननावरे (वय-34 रा. आंबेगाव पठार) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी सहकारनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे. 28 मे 2012 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी पाहिले. त्यांनी 13 साक्षीदार तपासले. पीडित मुलीची आई, स्केच आर्टिटीस्ट, केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट, ओळखपरेड यात महत्त्वाची ठरली. पीडित 9 वर्षीय मुलगी घटनेच्या दिवशी त्यांच्या राहत्या घराजवळील एका सुपर मार्केटमधून पोहे आणि शेंगदाणे घेऊन घरी जात होती. आरोपी तिच्या पाठीमागून दुचाकीवरून आला. माझी बहिण आणि मुलगी स्वीट होमजवळ उभी असून आम्ही या भागात नवीन आहोत तू माझ्याबरोबर चल, त्यांना घेऊ, त्यानंतर तुला सोडतो, असे आरोपी तिला म्हणाला. त्यानंतर तिच्या आईला फोन लावल्यासारखे केले. तिला दुचाकीवर बसवून अप्पर इंदिरानगर लेक टाऊन रोडवरील एका बिल्डींगमधील दुसऱ्या मजल्यावरील मोकळ्या जागेत घेऊन गेला. तिला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी या प्रकरणाचा तपास केला. पोलीस कर्मचारी आर. एन. नागवडे यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)