पुणे – आठ वर्षाच्या चिमुकलीला धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी 30 वर्षीय व्यक्‍तीला अटक केली. त्याला 25 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी दिला आहे.
गोविंद भगवान अडसूळ ( 30, मिलिंदनगर, पिंपरी) असे पोलीस कोठडी झाल्याचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित मुलगी ही आठ वर्षाची आहे. अडसुळ याने 14 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पिंपरी येथील स्मशानभूमी समोरील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्‍त सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)