चिमणी पुस्तकात नाही, प्रत्यक्षात दिसली पाहिजे

पानशेत – कादवे (ता. वेल्हे) गावात चिमण्यांची संख्या खूप प्रमाणात कमी झाल्याचे आढळून आल्याने मग अक्षय जागडे (वय 23) या युवकांने गावातील लहान-मोठ्या युवकांना घेऊन एक संकल्पना गावात राबवली आहे. चिमण्यांची संख्या का कमी होत आहे, त्यांना कशाची गरज आहे, त्यांची संख्या कशी वाढवली जाईल, यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. कादवे गावात कडवे गावठाणात एक वडाचे झाड आहे. त्यावर त्याला चिमण्यांची पाच-सहा घरटी आढळून आली आणि अक्षयने त्या दृष्टीने कामाला सुरुवात केली. आधी त्याने पाण्याचे एक कॅन अशा रीतीने कापले की त्यातील पाणी चिमण्यांना सहज पिता येईल. त्याच्या या उपक्रमाला चिमण्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. आता या झाडावर खूप चिमण्या येऊ लागल्या आहेत. या कामामध्ये अक्षयला गावातील युवक शंकर लोहकरे, उज्ज्वल जागडे, आर्यन जागडे, आदित्य लोणारे, चेतन जागडे, आकाश जागडे यांचे सहकार्य लाभले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)