चिपको आंदोलनाचे गुगलने साकारले खास ‘डुडल’

नवी दिल्ली : उत्तरप्रदेशच्या अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात ‘चिपको’ आंदोलनाची सुरुवात झाली.झाडे वाचवण्यासाठी केलेल्या चिपको आंदोलनाला आज ४५ वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त गुगलने खास ‘डुडल’ बनवले आहे.

चिपको आंदोलनाची सुरुवात १९७३ साली सुरू झाली होती. चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते. यामध्ये वृक्षतोडीचा विरोध करण्यासाठी स्त्रियांनी सहभाग नोंदविला

आज या आंदोलनाला ४५ वर्षे झाली. जंगल वाचवण्यासाठी खेड्यातील महिलांनी अनोख्या पद्धतीनं लढवलेल्या या आंदोलनाची दखल गुगलनं ही घेतली आणि डुडलच्या माध्यमातून संपूर्ण जगापर्यंत हे आंदोलन पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)