चिनी स्पेस लॅब पृथ्वीवर कोसळण्यापूर्वी दोन तास अगोदर माहिती मिळणार

बीजिंग (चीन) – चीनची पहिली स्पेस लॅब (अंतरिक्ष प्रयोगशाळा) येत्या आठवड्यात, म्हणजे 31 मार्च ते 4 एप्रिल या काळात कधीही पृथ्वीवर कोसळण्याची शक्‍यता वर्तवण्यात आलेली आहे. तिआनगॉंग-1 नावाची ही स्पेस लॅब 1 सप्टेंबर 2011 मध्ये अवकाशात सोडण्यात आली होती. पृथ्वीपासून 216 किमी अंतरावरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करीत आहे.

सुरुवातीला या स्पेसलॅबचा कार्यकाल दोन वर्षांचा होता; परंतु ठरलेल्या तारखेनंतर म्हणजे 1 जून 2013 नंतरही तो वाढवण्यात आला. मार्च 2016 नंतर या स्पेसलॅबकडून पृथ्वीवर कोणताही संदेश आलेला नाही. ही स्पेस लॅब चिनी अंतरिक्ष स्थानक (स्पेस स्टेशन) स्थापित करण्याच्या योजनेचा एक भाग होती. सन 2022 पर्यंत आपले अंतरिक्ष स्थानक स्थापित करण्याची चीनची योजना आहे.

ही स्पेसलॅब कधी आणि कुठे कोसळेल हे निश्‍चितपणे सांगता येणार नाही, मात्र ही स्पेसलॅब कोसळण्यापूर्वी सुमारे 2 तास त्याची माहिती मिळू शकेल असे एका चिनी अंतरिक्ष तज्ज्ञाने सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)