चिनी लष्कराचा तिबेट मध्ये युद्ध सराव

बिजींग – भारत आणि चीन मध्ये सिक्कीमच्या डोकलाम भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनच्या लष्कराने आज तिबेटच्या भागात युद्धसराव केला. त्यांनी पाच फायर एक्‍सरसाईज केल्याची माहिती चिनी लष्कराच्यावतीने देण्यात आली. तथापी हा सराव किंवा प्रात्यक्षिके नेमकी कधी केली गेली याची माहिती मात्र त्यांनी दिलेली नाही.

पिपल्स लिबरेशन आर्मीच्या तिबेट मिलिटरी कमांडच्या पथकाने हा सराव केला. तिबेट कमांड गार्ड कडेच भारत-चीन प्रत्यक्ष ताबा रेषेच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चीन मधून भारतात वाहणाऱ्या ब्रम्हपुत्रा नदीच्या पात्रालगतच या कमांडचे तळ आहेत. या युद्ध सरावाचे व्हीडीओ फुटेजही चिनी लष्कराकडून सोशल मिडीयावर टाकण्यात आले आहे. गेल्या दहा जुलैला ल्हासात तिबेटच्या मोबाईल कम्युनिकेशननेही अशाच प्रकारचा सराव केला होता. युद्धजन्य स्थितीत आणिबाणीच्या काळात मोबाईल संपर्क यंत्रणा कशी उभारायची या विषयीची ही प्रात्यक्षिके होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)