चिनी गुप्त शिबिरांत लाखो उईगर मुस्लिम कैदेत, राष्ट्रसंघाचा अहवाल 

बीजिंग (चीन): चिनी गुप्त शिबिरांत लाखो उईगर मुस्लिम कैदेत असल्याची माहिती राष्ट्रसंघाच्या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालाने चीनचे दुटप्पी धोरण उघडे पडले आहे. दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तानची सतत पाठराखण करणाऱ्या चीनने 10 लाखांपेक्षा अधिक उईगर मुस्लिमांना कट्टरवाद विरोधी गुप्त शिबिरांत कैद करून ठेवले आहे आणि अन्य 20 लाख मुस्लिमांचे विचारपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
चीनच्या या व्यवहारावर राष्ट्रसंघाच्या भेदभाव निर्मूलन समितीने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. चीनच्या शिनजियांग प्रांतात उईगर मुस्लिम बहुसंख्य असून हा प्रांत चीनने स्वायत्त घोषित केला आहे. समितीच्या अहवालावर जीनिव्हात समीक्षण चालू आहे. दरम्यान राष्ट्रसंघातील चीनचे राजदूत यू जियानहुआ यांनी तेथील आर्थिक प्रगती आणि वाढणाऱ्या जीवनमानाचा उल्लेख केला असला, तरी आपल्याला वेगळीच माहिती मिळाली आहे आणि याबाबतीत आपणास चिंता वाटत असल्याचे समितीचे उपाध्यक्ष मॅक्‍डोगॉल यांनी स्पष्ट केले. सामाजिक स्थैर्य आणि धार्मिक कट्टरवादाविरुद्ध कारवाईच्या नावाखाली उईगर स्वायत्त भागाचे गुप्त नजरबंदी शिबिरात रूपांतर झाल्यासारखे झाले आहे.
हजारो उईगर मुस्लिमांना कैद करण्यात आलेले असून त्यांना विचारपरिवर्तन करणाऱ्या शिबिरांत पाठवले आहे. सुमारे 10 लाख उईगर मुस्लिम कट्टरता विरोधी शिबिरात कैदेत आहेत आणि सुमारे 20 लाख राजकीय आणि सांस्कृतिक मतांतर करणाऱ्या पुनर्शिक्षण शिबिरांत जबरदस्तीने भरती करण्यात आलेले आहेत. परदेशातून येणारे शेकडो उईगर बेपत्ता झालेले आहेत. मात्र मॅक्‍डोगॉल यांनी आपल्याला मिळालेल्या माहितीचा स्रोत जाहीर केलेला नाही.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)