चिनी कर्जाच्या जाळ्यात फसून 8 देशांचा बरबादीकडे प्रवास

बीजिंग – चिनी कर्जाच्या जाळ्यात फसलेले 8 देश बरबादीच्या दिशेने जात आहेत, असा इशारा एका अहवालात देण्यात आला आहे. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट रिसर्चच्या एका अहवालानुसार पाकिस्तान आणि मालदीवसह जगातील 8 देश चिनी कर्जाच्या जाळ्यात फसून बरबाद होण्याच्या मार्गाने जात आहेत. सुमारे 8 लाख कोटी रुपये खर्चाचा, चीनचा अत्यंत महत्त्वाकांक्षी वन बेल्ट वन रोड हा प्रकल्प या आठ देशांच्या बरबादीचे कारण होऊ शकणार आहे.

एका अभ्यासानुसार युरोप, एशिया आणि आफ्रिकेत चालू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे हे देश कर्जाखाली दबले गेले आहेत. सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंट रिसर्चने अलीकडेच जगभरातील 68 देशांमधील बीआरआय फंडाच्या प्रकल्पांचा अभ्यास केला. यात आढळून आले की 23 पैकी 8 देश कर्जाच्या संकटांशी झुंजत आहेत, त्यांना आणखी बीआरआय संबंधित कर्ज दिले, तर ते कर्ज म्हणजे एक असाध्य रोग बनून जाईल.

मालदीव आणि पाकिस्तान या भारताच्या शेजारी राष्ट्रांसह जिबूती, किरगीजस्थान, लाओस, कंबोडिया, मंगोलिया, मॉंटेनेग्रो आणि कजाखस्तान यांचा समावेश आहे. श्रीलंका, कंबोडिया आणि नायजेरिया हे देश इच्छा नसतानाही चीनच्या अटींपुढे मान वाकवण्यास बाध्य झाले आहेत. श्रीलंकेला तर आपले बंदर चीनला वापर करण्यासाठी द्यावे लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)