चिनी एयरलाइन्सचे भारतीयांशी गैरवर्तन-प्रवाशाची तक्रार

बीजिंग (चीन),-चिनी एयरलाएन्स भारतीय प्रवाशांबरोबर गैरवर्तन करत असल्याची तक्रार प्रवाशाने केली आहे. शांघाई पुडॉंग विमान तळावर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले असून परराष्टृा मंत्रालयाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. परराष्टृ मंत्री सुषमा स्वराज यांच्या नजरेत ही गोष्ट आणल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयातील परराष्ट्र व्यवहार कार्यालयाकडे आणि पुडॉंग विमानतळ्‌ अधिकाऱ्यांकडे या बाबत तक्रार करण्यात आलेली आहे.

मात्र चीनने या प्रकाराचा इन्कार केला आहे. चिनी एयरलाईन्स प्रवाशांना दर्जेदार सेवा देतात असे या चिनी एयरलाईन्सने म्हटलेले आहे. एनएपीए(नॉर्थ अमेरिकन पंजाबी असोसिएशन) चे कार्यकारी संचालक सतनाम सिंग चहल हे नवी दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जात असताना त्यांना पुडॉंग विमानतळावर विमान बदलण्यासाठी थांबावे लागले.

तेथे व्हीलचेयरवरेल प्रवाशांसाठी असलेल्या गेटवर इन्सचे कर्मचारी भारतीय प्रवाशांशी उर्मटपणे वर्तन करताना त्यांना दिसले. त्याबाबत ते तक्रार करायला गेले असता ओरडून दम देऊन त्यांना गप्प करण्यात आले. ही घटना 6 ऑगस्टची आहे. भारत आणि चीन यांच्यात डोकलाम येथे गेले दोन महिने चालू असलेल्या सीमा तणावावरून आलेल्या निराशेपोटी ते असे वागत असावेत, असे चहल यांनी पत्रात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)