चिनी उत्पादनांवर अमेरिका 25 टक्‍के आयात शुल्क आकारणार

वॉशिंग्टन – चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या 200 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारण्याच्या प्रस्तावावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विचार करीत आहेत. याआधी चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा करण्यात आली होती. या नव्या जादा शुल्काच्या प्रस्तावामुळे व्यापारी युद्ध आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

ट्रम्प यांनी सुरवातीला 200 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 10 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. आता हे शुल्क 25 टक्‍क्‍यांवर नेण्याचा विचार अमेरिका सरकारकडून सुरू आहे. अमेरिकेने 34 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर 25 टक्के शुल्क आकारले आहे. आता आणखी 16 अब्ज डॉलरच्या चिनी उत्पादनांवर जादा शुल्क आकारण्याची योजना आहे. यामुळे अमेरिकेकडून चीनवर व्यापारी संबंध समतोल करण्यासाठी दबाव वाढल्याचे दिसत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याबद्दल बोलताना व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी प्रमुख साराह हकॅबी सॅंडर्स म्हणाल्या की, चीनने आता पर्यंत केलेल्या अप्रामाणिक व्यवहारांमुळे आम्हाला हा निर्णय घेणे भाग पडले आहे. त्याच बरोबर या प्रकरणी ट्रम्पच अंतीम निर्णय घेतील असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. तर यावेळी बोलताना अमेरिकेचे व्यापार प्रतिनीधी रॉबर्ट लिटीझर म्हणाले की, 10 जुलै रोजी झालेल्या बैठकीत ट्रम्पयांनी आम्हाला आदेश दिले आहेत की, चीन कडून आयात केल्या गेलेल्या माला मुळे अमेरिकेच्या शेतकरी तसेच कामगार वर्गाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चीनच्या मालावर 10 टक्‍के आयात शुल्कावरुन 25 टक्‍के आयात शुल्क आकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, ट्रम्पयांनी हा निर्णय घेण्यामागचे कारण म्हणजे चीनने आपल्या व्यापाराच्या जाचक अटी तात्काळ रद्द करून समतोल व्यापार होईल अश्‍या अटी निर्माण कराव्यात या साठी हे जास्तीचे आयात शुल्क लादण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)