चिनी आणि भारतीय यांनी परस्परांच्या भाषा शिकणे गरजेचे – सुषमा स्वराज

बीजिंग (चीन) – चिनी आणि भारतीयांनी परस्परांच्या भाषा शिकण्याची गरज आहे, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. परस्परांच्या भाषा शिकल्यामुळे चांगला सुसंवाद होऊ शकेल आणि त्यातून परस्परसंबंधात चांगली सुधारणा होऊ शकेल, दोन्ही देशांतील संबंध अधिक सुदृढ होतील असे त्यांनी म्हटले आहे. भारतीय दूतावासाने आयोजित केलेल्या भारत-चीन मैत्रीत हिंदीचे योगदान या विषयावर त्या बोलत होत्या.

जेव्हा दोन मित्र एकत्र येतात, तेव्हा त्यांना काय पाहिजे असते? आपल्या मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करायच्या असतात. त्यासाठी भाषेची गरज असते. त्यासाठी दोघांनाही परस्परांची भाषा समजणे गरजेचे आहे. मला चिनी येणे आवश्‍यक आहे, तसे तुम्हाला हिंदी येणे गरजेचे आहे. दोन मित्रांमध्ये जेव्हा दुभाष्या येतो, तेव्हा तो केवळ परस्परांच्या शब्दांचा अनुवाद करतो. तो त्या शब्दांमागील भावना व्यक्त करू शकत नाही.

दिनांक 27 आणि 28 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची शिखर परिषद होणार असल्याचे जाहीर झाल्यानंतरच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ज्या प्रकारे भारत आणि चीन यांचे संबंध सुधारत आहेत; ज्या वेगाने या दोन देशांमधील व्यापार वाढत आहे; आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या प्रकारे आपण एकत्र काम करत आहोत; त्यासाठी तुम्ही हिंदी शिकणे आणि आम्ही चिनी शिकणे हे अत्यावश्‍यक आहे. जेव्हा भारतीय चीनमध्ये येतील, किंवा चिनी भारतात येतील तेव्हा त्यांना भाषेची अडचण होऊ नये. त्यांना दुभाष्याची गरज भासू नये.
परस्परांची भाषा शिकणारे तुम्ही विद्यार्थी दोन देशातील संबंध जितके मजबूत करू शकता, तेवढे दोन देशांचे परराष्ट्र मंत्री करू शकत नाहीत असे सुषमा स्वराज यांनी भाषा शिकंणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील वृत्त वाचण्यात आले हा डायलॉग एखाद्या सिनेमातील अथवा नाटकातील वाटावा असेच म्हणावे लागेल स्वतः सुषमाताईंना आपल्या देशातील एकूण भाषे पैकी किती भाषा अवगत आहेत ? देशाची जर अधिकृत भाषा हिंदी समजल्या जाते तर संपूर्ण देशांतर्गत कारभार हिंदी भाषेत किती होतो व इंग्रजीत भाषेत किती होतो ? त्यातच हिंदी भाषेला आपल्या देशात जाहीर विरोध होतो तिला विटाळ म्हणून तुच्छच लेखण्यात येते हे कशाचे द्योतक समजावे ? हा व असे विविध प्रकार भाषे बाबत चीन ह्या देशात पाहावयास मिळतात का ? राष्ट्राभिमान देशाभिमान रुजवावयाचा असेल तर देशाची भाषा एक असावयास हवी जी चीन ह्या देशात पाहावयास मिळते अथवा इतर अनेक प्रगत देशात मिळते तसे आपल्या देशात पाहावयास मिळते का ? मुळात आपल्या देशाचे नाव हिंदुस्तान , भारत , कि इंडिया ? हेच अजून निश्चित झालेले नसताता चीन देशाला असे कोरडे उपदेश करून आपण स्वताहा बरोबरच देशाचे हसे करून घेतलेत असे समजल्यास चूक ठरेल का ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)