चिदंबरम यांनी मोदींना ऐकवली कॉंग्रेस अध्यक्षांची यादी

नवी दिल्ली: कॉंग्रेसने एकदा तरी नेहरू गांधी परिवाराबाहेरील एखाद्या व्यक्तीला पक्षाचे अध्यक्ष करून दाखवावे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल एका निवडणूक प्रचार सभेत केले होते. त्यावर जोरदार पलटवार करीत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिंदरबरम यांनी त्यांना या परिवाराबाहेरील किती व्यक्तींनी आत्तापर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे याची यादीच ऐकवली आहे.

आपल्या ट्‌विटर अकौंटवर त्यांनी कॉंग्रेसच्या 1947 पासूनच्या अध्यक्षांची यादी सादर केली आहे. त्यात आचार्य कृपलानी, पट्टाभी सीतारामैय्या, पुरूषत्तोमदास टंडन, यु. एन. ढेबर, संजीव रेड्डी, संजीवैय्या, कामराज, सी गोपालाचारी, जगजीवन राम, शंकरदयाल शर्मा, डी. के बारूआ, ब्रम्हानंद रेड्डी, पी. व्ही नरसिंहराव, आणि सीताराम केसरी या परिवाराबाहेरील नेत्यांकडे कॉंग्रेसचे अध्यपद असल्याचे मोदींच्या निदर्शनाला आणून दिले आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होणार या विषयी पंतप्रधानांनी स्वारस्य दाखवून त्यावर बराच वेळ व्यतित केल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत असा टोमणाहीं त्यांनी मोदींना मारला आहे.

-Ads-

कॉंग्रेसवर बोलण्यात मोदी जितका वेळ घालवतात त्याच्या निम्मा वेळ खर्चून त्यांनी नोटबंदी, जीएसटी, राफेल, सीबीआय, आरबीआय याविषयांवरही बोलावे असे आवाहन त्यांनी केले. शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या, वाढती बेरोजगारी, जमावाकडून ठेचून होणाऱ्या हत्या, बलात्कारांचे वाढते प्रमाण, इत्यादी विषयांवर मोदी कधी बोलणार आहेत असा सवालही चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. मोदींनी काल छत्तीसगड मधील अंबिकापुर मध्ये झालेल्या सभेत गांधी नेहरू परिवारावर टीका करताना हा मुद्दा उपस्थित केला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)