पी. चिदंबरम यांना कोर्टाकडून दिलासा

नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनक्स मीडिया प्रकरणामध्ये 3 जुलैपर्यंत अटक करू नये असा आदेश देत तात्पुरता दिलासा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. एअरसेल मार्क्सिस प्रकरणातही दिल्ली हायकोर्टाने चिदंबरम यांना 5 जूपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.

चिदंबरम यांचे वकिल म्हणून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली असून या प्रकरणी तयारीसाठी आणखी वेळ मागितला. या प्रकरणी हायकोर्टात अटकपूर्व जामिनाची चिदंबरम यांची मागणीही प्रलंबित असल्याचे सिब्बल यांनी निदर्शनास आणले. ईडी व सीबीआय आर्थिक अफरातफर झाल्याचा संशय असल्यामुळे एअरसेल मार्क्सिस या प्रकरणाचा छडा लावत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फेब्रुवारीमध्ये सीबीआयने चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याला अटक केली. आएनएक्स मीडियामध्ये 305 कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक करण्यात आली होती. त्यास मंजुरी देताना अनियमितता असल्याचे तपास संस्थांना वाटत आहे.  या प्रकरणी कार्तीने 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप सीबीआयने केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)