चिदंबरम यांच्या नातेवाईकाचे अपहरण करून खून

कोईमतुर – ज्येष्ठ कॉंग्रेस नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या येथील एका नातेवाईकाची काही इसमांनी अपहरण करून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. सी शिवमुर्ती असे या हत्या झालेल्या नातेवाईकाचे नाव आहे. ते कपडे निर्यातदार आहेत. 25 जून रोजी ते बेपत्ता झाल्याची तक्रार तिरूपूर येथे नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी या अपहरणकर्त्यांचा माग काढून त्यांना अटक केली. त्यांनी शिवमुर्ती यांच्या हत्येची कबुली दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आपण शिवमुर्ती यांचे तिरूपूर येथून अपहरण करून त्यांना मेट्टापलयम येथे नेले आणि सोमवारी त्यांची हत्या केल्याची माहिती या तीन संशयीतांनी दिली आहे. हत्या करून त्यांचा मृतदेह होसुर जवळील तलावात फेकून देण्यात आला आहे. शिवमुर्ती हे चिदंबरम यांच्या मेव्हणीचे जावई आहेत. त्यांच्या हत्येचे नेमके कारण मात्र अजून समजलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)