चिदंबरम यांची ईडीकडून पुन्हा चौकशी

नवी दिल्ली – एअरसेल मॅक्‍सिसस मनि लॉड्रिंग प्रकरणात ईडीने म्हणजेच सक्त वसुली विभागाने चौथ्यांदा माजी अर्थमंत्री पी चिदबंरम यांची चौकशी केली. त्यांना या चौकशीसाठी आधीच समन्स बजावण्यात आले होते त्यानुसार ते सकाळी ईडीच्या कार्यालयात हजर राहिले.

या प्रकरणात त्यांची गेल्या 24 ऑगस्ट रोजी सलग सहा तास चौकशी झाली आहे. थेट विदेशी गुंतवणुकीचे प्रस्ताव मान्य करताना चिदंबरम यांनी त्यांच्या काळात कोणती कार्यपद्धती अवलंबली होती या अनुषंगाने त्यांना आज काही प्रश्‍न विचारण्यात आल्याचे समजते. या प्रकरणात सीबीआयने पंधरा दिवसांपुर्वीच आरोपपत्र दाखल केले असून आता ईडीकडूनही लवकरच एक आरोप पत्र चिदंबरम यांच्यावर दाखल केले जाण्याची शक्‍यता आहे.

ईडीने या प्रकरणातील आपली चौकशी शक्‍य तितक्‍या लवकर पुर्ण करावी अशी सुचना न्यायालयाने त्यांना केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)