चिदंबरम यांची ईडीकडून दुसऱ्यांदा चौकशी

नवी दिल्ली – माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची सक्‍तवसुली संचलनालयाने आज एअरसेल मॅक्‍सिस प्रकरणी दुसऱ्यांदा चौकशी केली. चिदंबरम यांची 5 जून रोजी पहिल्यांदा चौकशी झाली होती. तेंव्हाच त्यांना आज चौकशीसाठीचे समन्सही देण्यत आले होते. त्यानुसार सकाळी 11 वाजण्यापूर्वी “ईडी’च्या मुख्यालयामध्ये हजर झाले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “ईडी’कडून आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याखाली चिदंबरम यांचा जबाब नोंदवून घेतला जाण्याची शक्‍यताही या अधिकाऱ्याने व्यक्‍त केली.

एअरसेल मॅक्‍सिस व्यवहार आणि चिदंबरम यांनी घेतलेल्या निर्णयांसंदर्भात चिदंबरम यांना नव्याने प्रश्‍नावली दिली जाण्याची शक्‍यताही वर्तवली जात आहे. यापूर्वीच्या 5 जून रोजी “ईडी’ने तब्बल 6 तास चिदंबरम यांची कसून चौकशी केली होती. 5 जून रोजीच्या चौकशीनंतर “ईडी’च्या मुख्यालयातून बाहेर पडल्यावर “आपण तपास संस्थेला सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली. ही उत्तरे सरकारी कागदपत्रांमध्ये यापूर्वीच नोंदवली गेली होती.’असे ट्विट त्यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“ईडी’च्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी “फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड’च्या अधिकाऱ्यांचे जबाबही नोंदवून घेतले आहेत. त्यासंदर्भात ही नवीन प्रश्‍नावली असेल. याशिवाय तत्कालिन परिस्थिती आणि “एफआयपीबी’तील निर्णयप्रक्रियेच्या बाबतीतही प्रश्‍न विचारले जाण्याची शक्‍यता आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची “ईडी’कडून या प्रकरणी दोनवेळा चौकशी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)