चिथावणीखोर मुलाखत दिल्या प्रकरणी बांगलादेश येथे छायाचित्रकाराला अटक

ढाका (बांगलादेश) – बांगलादेश येथे चालु असलेल्या आंदोलना दरम्यान चिथावणीखोर मुलाखत दिल्या प्रकरणी बांगलादेश पोलिसांनी येथिल जेष्ठ छायाचित्रकार शाहिदुल आलमयांना अटक करण्यात आले आहे.

बांगलादेश येथे रविवारी दोन महाविद्यालयीन तरुणांचा दोन बसमध्ये सापडून मृत्यू झाला. यामुळे हजारो नागरिक सरकारचा निषेध करण्यासाठी बाहेर पडले आणि संपूर्ण देशात हे आंदोलन पेटले होते. या आंदोलना दरम्यान आंदोलकांनी धुडघुस घातला होता, त्यावेळी 100 हुन अधिक नागरीक जखमी झाले होते. यावेळी जमावाला काबुत करण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि रबर बुलेट्‌स चा वापर करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जमावाने चवताळुन जाऊन पोलिसांसह माध्यमांचे छायाचित्रकार, पत्रकार यांच्या सह अमेरीकेच्या राजदूतांच्या गाडीवर देखिल हल्ला चढवला होता.

-Ads-

पोलिसांच्या या कर्यवाहीचा विरोध करताना आंदोलकांची बाजु मांडणारी मुलाखत शाहिदुल आलम यांनी कतार स्थित एका वृत्तवाहिनीला दिली होती. हि मुलाखत प्रसिद्ध झाल्या नंतर काहि वेळातच शाहिदुल आलम (वय 63) यांना किमान 20 साध्या वेशातील पोलिस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले अशी माहिती त्यांचे सहकारी अबिर अब्दुल्ला यांनी एएफपीला सांगितले.

तर, यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी शाहिदुल आलम यांना अतक करुन आमच्या कार्यालयात आणण्यात आले आहे. आम्ही त्यांनी विविध माध्यमांना दिलेल्या खोट्या माहिती आणि चिथावणीखोर मुलाखत प्रकरणात त्यांची चौकशी केली असता ते योग्य उत्तर देऊ शकले नाहीत. व त्यांनी मान्य केले की मुलाखतीत मांडलेली मते ही त्यांची वैयक्तिक मत आहेत, त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरूद्ध कायदेशीर कारवाई केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)