चित्र प्रदर्शनातून मांडलंय “वॉटर कपचं तुफान’

खटाव तालुक्‍यात पाणी फाऊंडेशनच्या चित्र प्रदशनास उत्स्फूर्त प्रतिसाद

वडूज – खटाव तालुक्‍याला वरचेवर भेडसवणाऱ्या दुष्काळी स्थितीला जलसंधारणाची कामे केल्याशिवाय गत्यंतरच नाही, हे गावागावातील लोकांना पटवून देण्याच्या पंचायत समितीच्या प्रांगणात प्रेरणादायी चित्रप्रदर्शनाचे पानी फौंडेशन व महाराष्ट्र शासन यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणे व वाहून जाणारी माती आडवणे याचे शास्त्रशुध्द मार्गदर्शन दोन दिवसाच्या प्रदर्शनात देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नेमिची येतो पावसाळा, ही उक्ती निदान खटाव-माण तालुक्‍यात तरी कालबाह्य होऊ लागल्याचे दिसून येत आहे. दुष्काळी परस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढील समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी हिताला प्राधान्य देत गावागावात जलसाक्षरता आणि त्यातून जल व्यवस्थापनाबाबत जागृती व्हावी, या उद्देशाने चित्रप्रदर्शन भरवण्यात आले असल्याची माहिती पाणी फौंडेशन जिल्हा समन्वयक बाळासाहेब शिंदे व तालुका समन्वयक जितेंद्र शिंदे यांनी दिली.

गेल्या काही वर्षात तालुक्‍यातील अनेक गावांनी जलसंधारणाची कामे शास्त्रशुध्द पध्दतीने केल्याने पिढ्यानपिढ्या टॅंकरची मागणी करणाऱ्या गावांची संख्या घटली आहे. चित्रप्रदर्शनात ज्या गावांनी लोकसहभागातून कामे केली त्या गावातील पुर्वीची व सद्यस्थिती मांडण्यात आली आहे.

टॅंकर सुरू व्हावा, म्हणून जे ग्रामस्थ रस्त्यावर आंदोलन करत होते, त्याच ग्रामस्थांना आपल्या गावात पडणारे पाणी आपल्याच गावात जिरवायचे, ही उपरती झाली. रखरखत्या उन्हात हातात टिकाव, खोर, घमेले घेऊन रखरखत्या उन्हात घाम गाळून जलसंधारणाची कामे केली व आज ती गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली. सरकारकडे पाण्यासाठी आंदोलन करणारे तेच ग्रामस्थ वॉटर हिरो बनले. याचे प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रभावी उद्बोधन करण्यात आले.

याही वर्षी तालुक्‍यातील जास्तीत जास्त गावांनी जलसंधारणाच्या कामांत भाग घेऊन आपल्या गावाच दुष्काळातून समृध्दीकडे यशस्वी प्रवास व्हावा, असे आवाहन करण्यात येत होते. या प्रदर्शनाच्या माध्यमातून अनेक गावांना या जलसंधारण चळवळीच्या प्रवाहात आणण्याचे उदिष्ट आहे. प्रदर्शनाला शेतकऱ्यांसह शालेय विद्यार्थी, विविध हायस्कूल व कॉलेजच्या प्राचार्य, विविध राजकीय पक्ष यांच्याकडून व्यापक प्रतिसाद मिळाला. दरम्यान, भेट दिल्यानंतर प्रभाकर घार्गे म्हणाले, माण-खटाव भागात निसर्ग लहरी आहे.

ज्यावेळी व जिथे पाऊस पडतोय तिथं वळिवाच्या स्वरूपात दमदार पडतो. अशा वेळी पावसाचे पाणी अडवणे महत्वाचे आहे. त्यासाठी त्या-त्या गावांत पाणी साठवण्यासाठी तलाव, बंधारे, समतल चर, नदी, नाले, ओढे खोलीकरण करून भांडी तयार असणे आता काळाची गरज बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)