चित्रांच्या माध्यमातून उलगडला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा

पिंपरी – शहराचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आता चित्राच्या माध्यमातून उलगडला आहे. मुंबई येथील चित्रकारांनी त्यांच्या कुंचल्यातून इनॅमल पेंटमध्ये चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या भिंतीवर लक्षवेधक चित्रमालिका साकारली आहे. त्या माध्यमातून नाट्यगृहाला भेट देणाऱ्या रसिकांना एक अनोखा चित्र नजराणा पाहण्यास मिळत आहे.

रा. मोरे प्रेक्षागृह रविवारपासून खुले झाले आहे. नाट्यगृहाच्या भिंतीवर भक्ती-शक्ती समूह शिल्प, क्रांतिवीर चापेकर स्मारक, महासाधू मोरया गोसावी समाधी मंदिर, संत तुकाराम महाराज, महासाधू मोरया गोसावी, क्रांतिवीर चापेकर बंधू ही शहराचा ऐतिहासिक वारसा दर्शविणारी चित्रे चितारली आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर, पार्श्‍वगायिका आशा भोसले, साहित्यिक पु.ल.देशपांडे, प्र.के.अत्रे तसेच युवा गायक महेश काळे, नाट्य कलाकार प्रशांत दामले आदींची चित्रे लक्ष वेधून घेतात. त्याशिवाय, पिंपरी-चिंचवड महापालिका इमारत, मेट्रो यांची चित्रे देखील येथे नजरेस पडतात. त्याशिवाय, लावणी नृत्य व विविध सांस्कृतिक विषयांवरील चित्रे लक्षवेधक आहेत.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या सूचनेनुसार गेल्या आठवडाभरात हे काम पूर्ण करण्यात आले. प्रसिद्ध चित्रकार सुनील शेगावकर यांच्या संकल्पनेतून ही चित्रमालिका साकारली आहे. प्रवीण गांगुर्डे, प्रभाकर कांबळे, महेश सौदत्ते, मोहसीन मटवाल, उत्तम जनवाडे, भार्गव कुलकर्णी, तौसिफ मटवाल, मिलिंद भागवत, उमेश फुटाणे या चित्रकारांनी ही कलाकृती साकारली आहे. नाट्यगृहाच्या अंतर्गत सजावटीसाठी नाटक या विषयावर वाडा चिरेबंदी या नाटकातील एक हुबेहूब प्रसंग चित्राच्या माध्यमातून शेगावकर यांनी भिंतीवर साकारला आहे. आठ बाय पाच फूट आकाराचे हे चित्र आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)