चित्रांचे प्रदर्शन भरवून शिवजयंती साजरी

चाकण- येथील श्री शिवाजी विद्या मंदिर माजी विद्यार्थी तसेच खेड तालुका कलाअध्यापक संघ व श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण यांच्या संयुक्‍त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित तालुकास्तरावर चित्रकला स्पर्धाचे आयोजन दोन गटांत करण्यात आले होते. यामध्ये 40 शाळांनी सहभाग घेतला व यातील निवडक चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी बक्षीस वितरण जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय वाडेकर, सरचिटणीस सुभाष गारगोटे, सहाय्यक सचिव किशोर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले . तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून बक्षीस वितरणाला सुरवात झाली. याप्रसंगी मुख्यद्यापिका माधुरी कोळी, उपप्राचार्य बाळासाहेब खामकर, राजू दीक्षित, शंकर बर्वे, पुणे जिल्हा कलाध्यापक संघाचे कार्याध्यक्ष मिलिंद शेलार, पांडुरंग नेवसे, किरण गोपळे, सतीश नायकवाडी दशरथ खडे, संदीप शिंदे, आशिष शेवकरी उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षण रामकृष्ण आगरकर व पांडुरंग शिरसाठ यांनी केले. गटांनुसार विजेते (शाळा) – मोठा गट : पौर्णिमा वाळुंज (सुमंत विद्यालय पिंपरी बुद्रुक), रिया ठाकूर (कलासिद्धी क्‍लासेस ऍकडमी, राजगुरूनगर), पूजा खंडागळे (तुकाराम मामा साहेब मोहळ, वाशेरे). लहान गट : सार्थक चव्हाण (श्री शिवाजी विद्या मंदिर), शंतनू पचारणे (के टी इ एस इंग्लिश मीडियम स्कूल, राजगुरूनगर), साई जगताप (भैरवनाथ विद्यालय, कुरुळी).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)