चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी सुशांत शेलार

न्यायालयाच्या निर्णयानंतर फेरमतमोजणीत विजयी

माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांचा 16 मतांनी पराभव

कोल्हापूर – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या एप्रिल रोजी झालेल्या निवडणुकीत आज तब्बल अडीच वर्षानंतर झालेल्या फेरमतमोजणीत अभिनेते सुशांत शेलार हे विजय झाले आहेत. प्रतिष्ठेची लढाई ठरलेल्या निवडणुकीच्या फेरमतमोजणीत माजी अध्यक्ष अभिनेते विजय पाटकर यांचा मतांनी पराभव करून सुशांत शेलार विजयी झाले आहेत. या फेरमतमोजणीकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक 26 एप्रिल 2016 रोजी झाली होती. या निवडणुकीत सर्वाधिक मते मिळल्याने अभिनेते गटातून विजय पाटकर यांना विजयी घोषित करण्यात आलं होतं यावेळी झालेल्या मतमोजणी प्रक्रियेला अभिनेते सुशांत शेलार यांनी आक्षेप घेतला होता. तसेच तत्कालिन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे फेर मतमोजणी घ्यावी अशी मागणी देखील केली होती. परंतु तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी फेटाळून लावत अभिनेते विजय पाटकर विजय झाल्याचे सांगितलं. आणि तसा निर्णय ही घोषित केला होता.

या निर्णयाविरोधात अभिनेता सुशांत शेलार हे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. शेलार यांनी वेळोवेळी न्यायालयात आपलं म्हणणं सादर करत आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत दाद मागितली. तब्बल अडीच वर्षानंतर एप्रिल 2016 मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीची फेरमतमोजणी घेण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांना देण्यात आले. कोल्हापूरच्या धर्मादाय आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशानुसार आज फेरमतमोजणी घेतली सकाळी 11 वाजल्यापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयात ही मतमोजणी सुरू होती सायंकाळी पाच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर अभिनेता सुशांत शेलार यांना 591 मत पडल्याचं सांगितलं तर अभिनेता विजय पाटकर यांना 575 मत पडल्याचं जाहीर केलं. सर्वाधिक मत सुशांत शेलार यांना मिळाल्याने सुशांत शेलार सोळा मताने विजयी झाल्याचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

या विजयानंतर चित्रपट महामंडळाच्या कार्यालयात सुशांत शेलार याचं अभिनंदन करण्यात आले. यावेळी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांचेसह चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी आणि महामंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते

पराभव मान्य- विजय पाटकर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या फेर मतमोजणीत माझा झालेला पराभव मला मान्य आहे मी चित्रपट महामंडळ यापूर्वीही खूप चांगलं काम करत होतं आणि भविष्यातही खूप चांगलं काम करेल असा मला विश्वास आहे. संचालक म्हणून आम्ही काम करत होतो आता सभासद म्हणून मी काम करेन. आजची ही प्रक्रिया पूर्ण पारदर्शी झाली आहे.

कमी वेळेत चांगल काम करू-सुशांत शेलार

एप्रिल 2016 मध्ये झालेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या मतमोजणी ला मी आक्षेप नोंदवला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आज झालेल्या फेरमतमोजणीमुळे सोळा मतांनी माझा विजय झालेला आहे. मला अडीच वर्षांचा कालावधी मिळत असला तरी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करेन हा अडीच वर्षांचा कालावधी मला विजय पाटकर यांच्यामुळेच मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)