‘चित्रपट प्रेक्षकांना विश्वासार्ह वाटणे गरजेचे’

पुणे – चित्रपटातील प्रत्येक गोष्ट वास्तववादी असेलच असे नाही, पण चित्रपट प्रेक्षकांना विश्वासार्ह वाटणे गरजेचे असते. चित्रपटांतील संवाद जेव्हा पात्रांच्या तोंडी ऐकायला मिळतात, तेव्हा ते पुन्हा लिहिले जातात, असे मत “चुंबक’ या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप मोदी यांनी व्यक्‍त केले. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

17 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत आयोजित “पिफ फोरम’मध्ये संदीप मोदी आणि शेरिंग युडन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या चित्रपटामध्ये मी पहिल्यांदा अभिनयाचा अनुभव घेतला. त्यामुळे बऱ्याच गोष्टी मला माहिती नव्हत्या. पण कॅमेरा सुरू झाल्यावर सगळे व्यवस्थित होते, असा अनुभव “द रेड फालुस’ चित्रपटाच्या अभिनेत्री शेरिंग युडन यांनी सांगितला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)