चित्रपट निर्मितीच्या आमिषाने 31 लाखांचा गंडा

पिंपरी – मराठी चित्रपटात निर्माता म्हणून भागीदारी देऊ असे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची 31 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिलाधर जगनाथ वराडे (वय-53, रा. शिवतेजनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली असून रोहीत कांतीलाल भोसले (वय व पत्ता माहिती नाही) याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहीत याने लिलाधर यांना मराठी चित्रपट तयार करु त्यासाठी रोहर्श नावाची चित्रपट निर्मीतीची कंपनी तयार करुन त्यामध्ये भागीदारी देऊ व निर्माता म्हणून चित्रपटात सहभाग देऊ असे आमिष दाखवले. त्यासाठी लिलाधर यांच्याकडून 15 लाख रोख घेतले व 16 लाख रुपये “एनईएफटी’ व “आरटीजीएस’द्वारे घेतले. मात्र, लिलाधर यांनी चित्रपटाबाबतची विचारणा केल्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरूवात केली. चित्रपट निर्मितीची कंपनी बंद पाडू, असे धमकावले. माझे कोणीच काहीच बिघडवू शकत नाही म्हणत लिलाधर यांचा मुलगा भुपेंद्र वराडे याला हातपाय तोडण्याची धमकी दिली. याबरोबरच आरोपीने चित्रपट निर्मितीसाठी 9 वेगवेगळ्या विभागासाठी दिलेले धनादेश देखील फिर्यादी यांना परित दिले नाहीत. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)